शेतमालास प्रोत्साहन देण्यासाठी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये कॉप शॉप

आता कॉप शॉपच्या माध्यमातून तुम्ही शेतातला चांगला ,ताजा शेतमाल योग्य किंमतीत खरेदी करू शकता. शेतीमालाच्या थेट विकीला प्रोत्साहन देण्यासाठी सहकार आणि पणन विभागाने जिल्हयात 12 कॉप शॉप सुरूकेले आहे. कल्याण शहरात 3, उल्हासनगर 2, मुलुंड 2, भिवंडी 1, अंबरनाथ 1 आणि ठाणे शहरात 3 सोसायट्यांमध्ये हे कॉप शॉप सुरु झाले आहे. सहकार आणि पणन विभागाच्या या योजनेला शहरी भागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. शेतकरी ते ग्राहक उपकमांतर्गत ठाणे जिल्ह्यात 16 शेतकरी कंपन्या स्थापन करण्यात येत आहे. त्यात सुमारे 2 हजार शेतकरी एकत्र आले आहे. सद्यस्थितीत उस्मानाबाद, नाशिक, सावर्डे, मुरबाड या भागातील शेतकरी कंपन्या ठाणे जिल्हयातील सोसायट्यांशी जोडण्यात आल्या आहे. या शेतक-यांचा शेतमाल आठवडयात ठरवून दिलेल्या दिवशी सोसायटयांपर्यत पोहचविण्यात येत आहे. ग्राहकांना रास्त दरात ताजा आणि वैविध्यपूर्ण भाजीपाला, फळभाज्या आणि फळे उपलब्ध होत आहे.याशिवाय, जिल्हयात विविधकार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या वतीने कृषी पूरक व्यवसाय सुरूकरण्यात आले आहे. अटल महापणन विकास अभियानात संस्थांनी नवे उद्योग उभारणीसाठी नामांकित खासगी कंपन्यासोबत करार करण्यात आलेआहे. यामध्ये महाराष्ट्ग्रामीण सामाजिक परिवर्तन अभियानयातून ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सोसायट्या, खरेदी विकी संघ, शेतकरी उत्पादक संघ, अशा संस्थाना सक्षम करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. या संस्था एखाद्या माकेटींग करणा-या कंपनीशी करार करुन त्या माध्यमातून शेतीतील उत्पादनाची विकी, त्याचे ब्रँंडिंग पॅकेजिंग करून बाजारात आणण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी जिल्हयातील सहकारी संस्थेच्या सभासद शेतक-यांनी अशा व्यवसायात सहभागी होऊन आपला विकास साधावा असे आवाहन, विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: