शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू होणार आहे. याचा फायदा ७९१ कर्मचा-यांना जानेवारीच्या पगारातून मिळणार आहे अशी माहिती महापौर मिनाक्षी शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कर्मचा-यांना महापालिका कर्मचा-यांप्रमाणेच वेतनश्रेणी लागू व्हावी यासाठी १० वर्षापासून जिल्हा शिक्षक सेनेच्या माध्यमातून कर्मचा-यांचा लढा सुरू होता. या लढ्याचीच फलश्रृती म्हणून शिक्षण विभागातील कर्मचा-यांना आश्वासित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ७९१ कर्मचा-यांना लाभ होणार असून उर्वरीत २४४ कर्मचा-यांना २४ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा फायदा मिळेल. त्याचप्रमाणे गेल्या ४ वर्षाचा फरकही कर्मचा-यांना मिळणार आहे. यामुळे प्रत्येक कर्मचा-याच्या पगारात २२०० ते २८०० रूपये वाढ होणार असल्याची माहिती महापौरांनी यावेळी बोलताना दिली. काही शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदं रिक्त होती त्यामुळं अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता पदोन्नतीनं मुख्याध्यापकांची पदं भरण्यात आली असून मराठी माध्यम ३१, हिंदी माध्यम ५, उर्दू माध्यम १६ अशी एकूण ५२ मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading