शिक्षकांइतकाच ग्रंथपालही महत्वाचा – विनोद तावडे

विद्यार्थ्यांच्या प्रगतीत शिक्षकांच्या तोडीस तोड अशी ग्रंथपालाची भूमिका असते. त्यामुळं त्यांच्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्राधान्य दिलं जाईल असं राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितलं. माध्यमिक शाळा ग्रंथपालांच्या आनंदोत्सवात विनोद तावडे बोलत होते. विशेष म्हणजे नेहमीचं भाषण आटोपतं घेऊन त्यांनी स्वत: व्यासपीठावरून खाली उतरून ग्रंथपालांशी संवाद साधला आणि त्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरं दिली. ग्रंथपाल म्हणजे कपाटातून पुस्तक काढून देणारा आणि आलेली पुस्तकं लावणारा नसून एखाद्याच्या आयुष्यात ग्रंथपाल मोठी भर घालू शकतो ते शिक्षकांच्या तोडीस तोड काम करतात. म्हणूनच आपण वेतनाबाबत पाठपुरावा केला. गेली २२ वर्ष अर्धवेळ म्हणून काम करणा-या ग्रंथपालांना पूर्णवेळ म्हणून समायोजन करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: