शहरातील फेरीवाल्यांना ६ हजार कागदी पिशव्यांचं वाटप

ठाणे महापालिका आणि कॅनेटिंग ह्युमॅनिटी यांच्या वतीनं शहरातील फेरीवाल्यांना ६ हजार कागदी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं. तर मुंब्रा बाजारपेठेत प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत ३० हजार रूपये दंड आणि ४५३ किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं. प्लास्टीक बंदी जाहीर करूनही भाजी-फळ विक्रेते हलक्या प्रतीच्या प्लास्टीकच्या पिशव्या वापरताना दिसत असून प्लास्टीक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी ६ हजार कागदी पिशव्यांचं शहरातील फेरीवाल्यांना वाटप करण्यात आलं. महापालिकेच्या गावदेवी मार्केट येथील विक्रेत्यांवर प्लास्टीक विरोधात कारवाई करून त्यांच्याकडील प्लास्टीक पिशव्या जप्त करण्यात आल्या.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading