वाहतूक पोलीसाची कॉलर धरण्याचा प्रकार

एका विना हेल्मेट दुचाकीस्वारानं वाहतूक पोलीसाशी हुज्जत घालून त्याची कॉलर पकडण्याचा प्रकार जांभळी नाक्यावर घडला आहे. ठाणे नगर वाहतूक शाखेत कार्यरत असणारे पोलीस नाईक गणेश चौधरी हे इतर सहका-यांसमवेत जांभळी नाक्यावर वाहतुकीचं नियमन करत होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास जांभळी नाक्यावरून तलावपाळीच्या दिशेने विनाहेल्मेट येणारा दुचाकी स्वार नौशाद खान याला चौधरी यांनी अडवले. नौशाद खानकडे दुचाकीची कागदपत्रं नसल्यानं चौधरी यांनी त्याचा परवाना घेऊन दंडाची पावती तयार केली. पोलीसांच्या या कारवाईनं संतप्त झालेल्या नौशाद खाननं शिवीगाळ करत गणेश चौधरी यांच्या अंगावर दंडाची पावती फेकून दिली. तसंच गणवेशाची कॉलर पकडून नेमप्लेट तोडत बघून घेण्याची धमकी दिली. नौशाद खानवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: