वर्सोवा नवीन पूल वाहतुकीसाठी सोमवारपासून महिनाभर बंद

राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा नवीन पूलाच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं जाणार असल्यामुळं हा पूल येत्या सोमवारपासून २५ डिसेंबर पर्यंत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. वर्सोवा नवीन पूलाच्या दुरूस्तीचं काम दोन टप्प्यात केलं जाणार आहे. १५-१५ दिवस दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद राहील. अवजड वाहनांना या पूलावरून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. अवजड वाहनांसाठी ३ पर्यायी मार्ग देण्यात आले आहेत. अहमदाबाद कडून ठाण्याकडे येणारी जड-अवजड वाहनं मनोर, वाडा, भिवंडी मार्गे जातील, विरार बाजूकडून मुंबईकडे येणारी जड-अवजड वाहनं गणेशपुरी, वज्रेश्वरी, आंबाडी, भिवंडी या मार्गे जातील. वसई-विरार महापालिका हद्दीतून येणारी जड-अवजड वाहनं चिंचोटी, कामट, आंजूरफाटा, भिवंडी मार्गे ठाण्याकडे जातील.

 

Leave a Comment

%d bloggers like this: