लोकसंघर्षतर्फे शेतकरी आणि आदिवासींचा मोर्चा

दुष्काळातील शेतक-यांना नुकसान भरपाई द्यावी तसंच आदिवासींना वनहक्क द्यावेत या मागण्यांसाठी लोकसंघर्षतर्फे शेतकरी आणि आदिवासींचा एक मोर्चा काढण्यात आला होता. जलतज्ञ राजेंद्र सिंह आणि ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव या मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा आझाद मैदानावर जाणार असून तिथून विधान भवनासमोर आंदोलन करण्याचा शेतक-यांचा प्रयत्न आहे. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर ठाणे, मराठवाड्यामधील शेतकरी सहभागी झाले आहेत. स्वामीनाथन् आयोगाची अंमलबजावणी करावी, किमान दरामध्ये वाढ करावी, कर्जमाफीची योजना योग्य पध्दतीनं राबवावी, जमिनीचे हक्क मिळावेत, मजुरांना नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. याच मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे नाशिक ते मुंबई असा मोर्चा काढण्यात आला होता.

 

Leave a Comment

%d bloggers like this: