राज्य शासनाच्या महापरिवर्तन या उपक्रमांतर्गत शहरातील झोपडपट्ट्यांना आकर्षक रंगसंगतीत रंगवणं तसंच महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रकला प्रशिक्षण देणं या दोन योजनांबाबत रूबल नागी फौंडेशन आणि ठाणे महापालिका यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर महापालिकेतर्फे पालिका आयुक्तांनी तर रूबल नागी फौंडेशनच्या वतीनं रूबल नागी यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. ठाणे महापालिका क्षेत्रात महापरिवर्तन उपक्रमांतर्गत सहा प्रकल्प राबवण्यात येणार आहेत. यामध्ये झोपडपट्टी रंगवणे आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना चित्रकलेचं प्रशिक्षण देणं हे २ उपक्रम रूबल नागी फौंडेशनच्या वतीनं राबवण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या १०० शाळांमध्ये चित्रकला प्रशिक्षण या संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणार असून त्याचा खर्च महापालिका करणार आहे. रूबल नागी फौंडेशनच्या वतीनं देशभरात स्लम पेन्टींग आणि आर्ट स्कूल हे प्रकल्प राबवण्यात आले आहेत.
