राज्य परिवहन महामंडळामध्ये महिला चालकांची मोठी भरती करण्यात येणार असून महिलांनी यासाठी तयारी करावी अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ठाण्यात बोलताना दिली. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शहरातील अबोली महिला रिक्षा चालक आणि महिला बस कंडक्टरचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी सैन्यातून निवृत्त झालेल्या सैनिकांचा तसंच शहरातील अबोली रिक्षा चालकांचा आणि बस कंडक्टर महिलांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाविद्यालयात जाणा-या मुलींना राज्य परिवहन महामंडळातर्फे विनामूल्य पास दिले जाणार असल्याचंही यावेळी दिवाकर रावते यांनी सांगितलं.
