राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्ह्याला घवघवीत यश मिळालं आहे. क्रीडा आणि युवक संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग स्पर्धेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील मुलांनी घवघवीत यश मिळवलं आहे. या स्पर्धेत जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रातील मुलांनी १७ वर्षाखालील मुलांच्या गटात सांघिक विजेतेपद पटकावलं. प्रणित टाव्हरे, नमिया तरवाडी – कांस्य, रम्या पटेल, पल्लवी पवार – रौप्य तर हार्दीक लबडे, साई जुंद्रे, केतकी पाटील, मृदुला कदम या खेळाडूंनी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. या स्पर्धेत राज्यातील ९ विभागातील १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींच्या २६ संघातील ३३२ खेळाडू सहभागी झाले होते.

Leave a Comment

%d bloggers like this: