रस्त्यावर राहणा-या बेघरांसाठी उक्ती फौंडेशनचा मदतीचा हात

रस्त्यावर राहणा-या बेघरांसाठी उक्ती फौंडेशननं मदतीचा हात दिला आहे. उक्ती फौंडेशन ही संस्था वंचित घटकांसाठी काम करते. ऑटिझम सारख्या मानसिक विकारावर ही संस्था विशेष कार्य करते. रस्त्यावर राहणा-या बेघर व्यक्तींसाठी रात्रंदिवस निवासाची सुविधा देते. नौपाडा परिसरात असलेल्या महापालिकेच्या नागरी बेघर निवारा केंद्रातील बेघर व्यक्तींकरिता मुलभूत सुविधा देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करते. अशा बेघर व्यक्तींची काल आरोग्य तपासणी करण्यात आली. या बेघर व्यक्तींना मोफत आरोग्य सेवा मिळावी म्हणून तज्ञ डॉक्टरकडून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणी करण्यात आलेल्या बेघर नागरिकांना गरजेनुसार पुढील औषधोपचाराची मदत मिळवून दिली जाणार असल्याचं फौंडेशनच्या संचालिका गीतांजली लेले यांनी सांगितलं. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत शहरी बेघरांसाठी रात्र निवारे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत पंडीत दिनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत नौपाडा येथे तात्पुरत्या निवारा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. या निवारा केंद्रात २५ पुरूष आणि २५ महिला अशी ५० जणांची व्यवस्था करण्यात आली आहे. आता येथील बेघर व्यक्तींना मुलभूत कौशल्य विकास प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.

 

Leave a Comment