रस्ता रूंदीकरणात बाधित होणा-या बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आयुक्तांचे आदेश

शहरातील विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यासाठी तसंच रस्ता रूंदीकरणात बाधित होणा-या बांधकामांवर दोन दिवसात कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. महापालिकेमध्ये झालेल्या आढावा बैठकीदरम्यान पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. विकास आराखड्यांतर्गत रस्ते आणि ज्या ठिकाणी रस्ते रूंद करण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी २ दिवसात कारवाई करावी असे आदेश त्यांनी यावेळी दिले. शहरातील सर्व रस्ते रूंद आणि मोकळे करण्यासाठी बाधित बांधकामांवर धडक कारवाईचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले. या कारवाईअंतर्गत एम. एम. व्हॅली ते कल्याण रस्ता, कल्याण फाटा दत्त मंदिराच्या पाठीमागील रस्ता, पावशी रस्ता, दिवा-आगासन जंक्शन ते दिवा रेल्वे स्थानक, वाघबीळ रस्ता, नामदेववाडी शहर विकास योजनेतील रस्ता, रस्ता क्रमांक ३३ वागळे इस्टेट कामगार हॉस्पीटल रस्ता आणि रस्ता क्रमांक १६ या रस्त्यावरील ८०० रहिवासी आणि ३३८ वाणिज्य बांधकामं निष्कासित केली जाणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: