येत्या गुरूवारी रात्री मिथुन राशीतून होणार उल्का वर्षाव

येत्या गुरूवारी म्हणजे १३ डिसेंबरच्या रात्री मिथुन राशीतून होणारा उल्का वर्षाव खगोलप्रेमींना साध्या डोळ्यांनी पाहता येईल अशी माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. हा उल्का वर्षाव फेथन लघुग्रहाच्या मार्गातून जात असल्यामुळे होतो. लघुग्रह सूर्याभोवती भ्रमण करताना वाटेत धूलीकण सोडतात. पृथ्वी या मार्गातून जात असताना पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणामुळे धूलीकण पृथ्वीकडे खेचले जातात. पृथ्वी भोवतालच्या वातावरणात ते जेव्हा शिरतात त्यावेळी दाबामुळे ते जळून जातात.

Leave a Comment

%d bloggers like this: