मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी वाढीव चटईक्षेत्र लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची महेंद्र मोने यांची विनंती

शहरातील भाडेकरूयुक्त मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी जाहीर करण्यात आलेला वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक लागू होण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती ठाण्यातील एक सामाजिक कार्यकर्ते महेंद्र मोने यांनी शहरातील सर्व आमदार-खासदारांकडे केली आहे. भाडेकरूयुक्त मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी शासनानं २०१७ मध्ये वाढीव चटईक्षेत्र निर्देशांक दिला होता. याबाबतच्या अधिसूचनेमध्ये ठाण्याचाही समावेश करावा अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी २०१८ मध्ये केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी अशा इमारतींकरिता २ चटईक्षेत्र देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणाच राहिली असून अद्याप याबाबतची अधिसूचना न निघाल्यामुळं अशा इमारतींना वाढीव चटईक्षेत्र मिळू शकलेलं नाही. त्यामुळं अशा इमारतींमधून राहणारे रहिवासी जीव मुठीत घेऊन राहत आहेत. ठाण्यात समूह विकास योजना लागू करण्यासाठी धडपडणारे नेते मात्र यासाठी काहीच करत नसल्याचं दिसत आहे. त्यामुळं हा निर्णय लागू करण्यासाठी पाठपुरावा करण्याची विनंती महेंद्र मोने यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रविंद्र फाटक, प्रताप सरनाईक, संजय केळकर, खासदार राजन विचारे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: