मैत्रिणीसोबत बोलणा-या पतीला जाब विचारल्यानं संतप्त झालेल्या पतीनं पत्नीला पेटवून देण्याची खळबळजनक घटना घडली आहे. लोकमान्य पाडा नंबर ४ येथे योगिता घुंबारे या आपला पती आणि ३ वर्षाचा मुलगा तसंच सासू- सास-यांबरोबर राहतात. त्यांचे पत्नी बाबासाहेब हे वागळे इस्टेट येथील आशर आयटी पार्कमधील कॉलसेंटरमध्ये नोकरी करतात. शनिवारी संध्याकाळी कामावरून आल्यावर बाबासाहेब यांच्या मोबाईलवर त्यांच्या मैत्रिणीचा फोन आला. त्यावेळी पत्नी योगितानं कोणाचा फोन आहे अशी विचारणा केली. यामुळं संतापलेल्या बाबासाहेबांनी पत्नीला खेचत स्वयंपाकघरात नेऊन तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं. आगीच्या ज्वाळांनी होरपळणा-या पत्नीला पाणी शिंपडून वाचवण्याचा प्रयत्नही केल्याची माहिती पोलीसांनी दिली.
