मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत होर्डींग, बॅनर लावणा-या ६ जणांविरूध्द शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम, फेरीवाले, हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा प्रभाग समिती अंतर्गत अनधिकृत होर्डींग, बॅनर लावणा-या ६ जणांविरूध्द शहर विद्रुपीकरण कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईअंतर्गत मुंब्रा प्रभाग समिती परिसरातील १५७ बॅनर जप्त करण्यात आले. मुंब्रा स्टेशन ते कादर पॅलेस परिसरातील १४ हातगाड्या, ९ लोखंडी बाकडी, १ चायनीज गाडी, ५ लोखंडी पान टप-या, ४ मोटर सायकलवर कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे ७ मोठ्या शेडही तोडण्यात आल्या. मालमत्ता कर थकवल्याप्रकरणी २३ वाणिज्य गाळे सील करण्यात आले असून पाण्याचे १० पंपही जप्त करण्यात आले आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading