मुंब्रा पोलीसांनी जप्त केला स्फोटकांचा मोठा साठा

मुंब्रा पोलीसांनी स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे. मुंब्रा पोलीसांनी एका रिक्षावर पाळत ठेवून या रिक्षाचा तपास केला असता या रिक्षात पोलीसांना अडीचशे जिलेटिनच्या कांड्या आणि तितकेच डिटोनेटर्स मिळाले आहेत. मुंब्रा पोलीसांना एक व्यक्ती अशी स्फोटकं आणणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी पाळत ठेवली होती. एक रिक्षावाला ही स्फोटकं घेऊन जात असल्याचं पोलीसांच्या लक्षात आल्यावर पोलीसांनी त्याला पकडलं. गुलाबसिंग सोळंकी असं या रिक्षा चालकाचं नाव असून पोलीस त्याच्या सहका-यांचा शोध घेत आहेत. ही स्फोटकं राजस्थानहून चालणा-या तस्करीचा एक भाग असल्याचा पोलीसांना संशय असून यामध्ये एखादी टोळी कार्यरत असावी असं पोलीसांचं सांगणं आहे. बॉम्बशोध नाशक पथकानं जप्त करण्यात आलेल्या जिलेटिनच्या काही कांड्या आणि डिटोनेटर्स पुढील चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: