माघी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार – दा. कृ. सोमण

येत्या मंगळवारी म्हणजे १९ फेब्रुवारी रोजी माघी पौर्णिमेच्या दिवशी आकाशात सुपरमूनचं दर्शन होणार आहे. ही माहिती खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली. ज्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो त्यावेळी चंद्रबिंब १४ टक्के मोठं आणि ३० टक्के जास्त तेजस्वी दिसतं. चंद्र नेहमी पृथ्वीपासून सरासरी ३ लाख ८४ हजार किलोमीटर अंतरावर असतो. मंगळवारी माघ पौर्णिमा असून चंद्र पृथ्वीच्या जवळ म्हणजे ३ लाख ५६ हजार ७६१ किलोमीटर अंतरावर येणार आहे. मंगळवारी सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटांनी चंद्र पूर्व क्षितीजावर उगवेल. रात्रभर आकाशात दर्शन देऊन बुधवारी सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांनी पश्चिमेस मावळेल. भारतातून संपूर्ण रात्रभर सुपरमूनचं दर्शन साध्या डोळ्यांनीही घेता येईल. यानंतर २० मार्च रोजी फाल्गुन पौर्णिमेच्या रात्रीही सुपरमूनचं दर्शन होणार असून ते या वर्षातील अखेरचे असल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Leave a Comment