मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पासह २३ वर्षीय तरूणाला ठाणे गुन्हे शाखेनं केली अटक

मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पासह एका २३ वर्षीय तरूणाला ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली आहे. पनवेलचा रहिवासी असलेला सुनील मुटकळे हा सर्प विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. माहितीनुसार शीळफाटा रस्त्यावरील एका बारजवळ त्याला रंगेहात अटक करण्यात आली. मुटकळे याच्याकडून ४५ इंच लांबीचा दोन किलो वजनाचा भलामोठा मांडूळ साप हस्तगत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजारात या सापाची किंमत १० लाख रूपये असून हा साप त्याने कोणाला विक्री करण्यासाठी आणला होता याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: