महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने पटकावले कांस्यपदक

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित व्यावसायिक गटाच्या स्पर्धेत महावितरणच्या पुरूष आणि महिला कबड्डी संघाने कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेत पुरूष गटात एकूण ४५ संघ तर महिला गटात ५५ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत पुरूष गटात सर्वोत्कृष्ट पकडीचे पारितोषिक महावितरणच्या अमित जाधव यांना प्रदान करण्यात आले. राज्यस्तरीय व्यावसायिक स्पर्धेत मिळविलेल्या या यशाबद्दल दोन्हीही चमूचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे. महावितरणच्या पुरूष कबड्डी संघात सर्वश्री धिरज रोकडे, अजय शिंदे, निलेश ठाकूर, सुनिल सावंत, अमित जाधव, प्रमोद ढेरे, निवास गावडे, परिक्षित शिंदे, राहूल सणस, सुहास पुजारी आणि अभिजित पाडावे यांचा सहभाग होता तर महिला कबड्डी संघात हर्षला मोरे, सायली कचरे, श्रध्दा देसाई, अश्विनी शेवाळे, पुजा पाटील, शर्वरी शेलार, स्पृहाली बागवे, प्रियंका उगले, माया येलवंडे आणि सोनाली मोरे या खेळाडूंचा सहभाग होता. प्रशिक्षक आणि संघव्यवस्थापक म्हणून राष्ट्रीय कबड्डी खेळाडू संतोष विश्वेकर यांनी आपली जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading