महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारीला यंदाचा २१वा महापौर श्री किताब

ठाणे महापालिका आणि ठाणे जिल्हा शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित महापौर श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत अक्षय कारभारी यानं यंदाचा २१वा महापौर श्री किताब पटकावला. तर खारेगावच्या अपोलो जिमने सांघिक विजेतेपद पटकावलं. ठाणे महापालिका शरीरसौष्ठव पटूंच्या पाठीशी नेहमीच उभी असून पुढील वर्षी महापौर श्री पुरस्काराची रक्कम ५० हजार रूपये करण्यात येईल असं आश्वासन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी दिलं. या स्पर्धेचं सांघिक उपविजेतेपद कळव्याच्या अपोलो जिमने पटकावलं. सर्वोत्तम शरीरसौष्ठव प्रदर्शक म्हणून विजय गोग्स, प्रथम उपविजेता अरूण भोईर, द्वितीय उपविजेता आनंद पाटील, तृतीय उपविजेता संतोष पाटील ठरला. ही स्पर्धा एकूण ४ गटात झाली. पहिल्या गटात पुरूषोत्तम इरनक प्रथम, परशुराम बुरोंडकर द्वितीय तर सिध्देश घरतनं तृतीय क्रमांक पटकावला. द्वितीय गटात स्वप्नील वाघमारेनं प्रथम, अरूण भोईरनं द्वितीय तर कैलास कुतुबळेनं तृतीय क्रमांक पटकावला. तृतीय गटात अक्षय कारभारीनं प्रथम, प्रेम शिंदेनं द्वितीय तर रविराज सावंतनं तृतीय क्रमांक पटकावला. चौथ्या गटात राहुल जाधवनं प्रथम, वैभव कळमकरनं द्वितीय तर विजय गोग्सनं तृतीय क्रमांक पटकावला.

Leave a Comment

%d bloggers like this: