महापालिकेच्या भांडवली खर्चाच्या निविदांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निविदा स्वीकृती समिती निर्माण करण्याचा पालिका आयुक्तंचा महत्वाचा निर्णय 

महापालिकेच्या भांडवली खर्चाच्या निविदांची छाननी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निविदा स्वीकृती समिती निर्माण करण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीवजयस्वाल यांनी घेतला आहे. निधीची उपलब्धता आणि कामाची निकड याची सांगड घालून  समिती कोणती निविदा महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठवायची याची शिफारस करणार आहे. समितीच्याशिफारशीनंतर महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर संबंधित प्रकरणे निविदा छाननीआणि निविदा निवड समितीसमोर पाठविण्यात येणार आहेत.याबाबत अतिरिक्त आयुक्त  राजेंद्र अहिवर यांच्या अध्यक्षतेखाली या स्वीकृती समिती निर्माण करण्यात आली असून या समितीमध्ये, नगर अभियंता, मुख्य लेखा परीक्षक, मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी आदींचा समावेश आहे तर उप अभियंता रूपेश पाडगावकर या समितीचे सदस्य सचिव राहणार आहेत.ही समिती भांडवली खर्चाच्या सर्व निविदांची छाननी करणार आहे. सर्व निविदांची छाननी करून त्यानंतर निधीची उपलब्धता आणि कामाची निकड लक्षात घेवून कोणत्या निविदा महापालिका आयुक्त यांच्याकडेमान्यतेसाठी पाठवायच्या हे समिती शिफारस करणार आहे. या समितीच्या शिफारशीनंतर महापालिका आयुक्त त्यावर निर्णय घेणार आहेत. महापालिका आयुक्तांची मान्यता मिळाल्यानंतर ती प्रकरणेनिविदा छाननी आणि निविदा निवड समितीकडे पाठविण्यात येणार आहेत. त्यानंतर ती प्रकरणे स्थायी समितीच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.या निर्णयामुळे प्रस्तावाला महापालिका आयुक्तांची मंजुरी मिळाल्यानंतर निविदा काढल्यानंतर या समितीने शिफारस केल्यानंतरच महापालिका आयुक्त त्यावर निर्णय घेणार आहेत. यामध्ये केवळ भांडवली खर्चाच्या निविदांचा समावेश असून महसूली खर्चाच्या निविदांचा समावेश राहणार नाही असेही  जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Comment

%d bloggers like this: