महापालिकेच्या उत्पन्नवाढीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करण्याचे आयुक्तांचे आदेश

नवीन वर्षात लोकहिताच्या कामांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतानाच महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी जे उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने कठोर प्रयत्न करावेत असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी सर्व अधिका-यांच्या आढावा बैठकीत पालिका आयुक्तांनी हे आदेश दिले. महापालिका उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक विभागास ठरवून दिलेलं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रत्येक विभाग प्रमुखानं कठोर मेहनत घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. प्रशासकीय कामाचा निपटारा जलद गतीनं व्हावा यासाठी यापुढे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या, तिस-या आणि पाचव्या शनिवारी अभ्यागतांना भेट मिळणार नाही. अधिका-यांनी या दिवशी प्रलंबित कामांचा निपटारा करावा असे आदेशही पालिका आयुक्तांनी दिले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading