महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून 26 कोटींचे चेक वटवण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केल्याचं उघड

ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरी करून 26 कोटींचे चेक वटवण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीने केल्याचं उघड झाला आहे. ज्या बँकेत हे चेक डिपॉझिट करण्यात आले होते या बँकेने दाखवलेल्या हुशारीमुळे महापालिकेची ही रक्कम वाचली आहे. संबंधित व्यक्तीकडून 26 कोटींचे हे धनादेश बँकेत वटवण्यासाठी डिपॉझिट करण्यात आले होते. या धनादेशांवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल आणि आरोग्य अधिकारी आर टी केंद्रे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या होत्या. पुणे ते चेन्नई मधील खाजगी बँकांमध्ये हे धनादेश पटवण्यासाठी डिपॉझिट करण्यात आले होते हे धनादेश मोठ्या रकमेचे असल्यामुळे संबंधित बँकांनी याची खात्री करण्यासाठी महापालिकेकडे विचारणा केली त्यावेळी महापालिकेनं असे कोणतेही धनादेश दिले नसल्याचे सांगितले. नंतर या धनादेशांची खात्री करण्यात आली असता या धनादेशांवर बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.ठाणे महापालिकेने अज्ञात व्यक्तीविरुद्ध या प्रकरणी तक्रार दाखल केली असून सध्या पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading