महापालिका प्रशिक्षण संस्थेतील जलतरण पटूंचं सागरी जलतरण स्पर्धेत उत्तुंग यश

नियमित सराव, प्रशिक्षकांचं मार्गदर्शन आणि अधिका-यांचं सहकार्य यामुळे महापालिका प्रशिक्षण संस्थेतील जलतरण पटूंनी सागरी जलतरण स्पर्धेत उत्तुंग यश मिळवलं आहे. मालवण चिवला बीच येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत या ३१ प्रशिक्षणार्थींनी हे यश संपादन केलं आहे. या स्पर्धेत मारोतराव शिंदे तरण तलाव येथील ध्रुव कोळी, सायुज्य नाईक, अथर्व पवार, लष्कर मोरे, आरूष अडसुळे, अपूर्व पवार, करण नाईक, अन्मय मैत्री, आयुष राणे, पवन कदम, स्वयम् देसाई, सोहम पाटील, अद्वैत गावडे, पेशाने अभियंते असलेले वरद राजगौड, दिशांत बटुळे, सौरभ पंदिरकर, प्रशांत बटुळे, राजेश मेहता आणि भरत मोरे हे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. यशवंत रामा साळवी तरण तलाव येथील कृपा मर्दे, मानस सावंत, ध्रुव चेऊलकर, प्रेम मोरे, मोहित वर्मा, आदित्य रेगे, वैष्णव दळवी, स्वप्नील पिसके, मनोमय सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अनिल आणि विश्वास कांबळे हे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. अजित मर्दे यांनी या ३ किलोमीटर स्पर्धेत दुस-या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

Leave a Comment

%d bloggers like this: