महापालिका आयुक्तांच्या बदली प्रकरणात ४ आठवड्यात आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे शासनाला आदेश.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या बदली प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारवर ताशेरे ओढून ४ आठवड्यात आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ठाण्यातील सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी संजीव जयस्वाल यांचा ३ वर्षाचा कार्यकाळ उलटूनही ते कायम कसे? यावर उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान हे आदेश देतानाच नंतर वेळ देणार नसल्याची तंबीही न्यायालयानं दिली आहे. शहरातील रस्ते घोटाळा, थीम पार्क आणि बॉलिवूड पार्कमधील भ्रष्टाचार, शासकीय निवासस्थानी घरकामास ठेवलेल्या अल्पवयीन मुलीवरील कथित अत्याचार प्रकरण अशा विविध बाबींबाबत पालिका आयुक्त अडचणीत सापडले आहेत. विक्रांत कर्णिक यांनी आयुक्तांविरोधात पोलीसांकडे तक्रार दाखल करून उपोषणही पुकारलं होतं. एवढं सगळं होऊनही प्रशासकीय नियमाप्रमाणे तीन वर्षाचा कार्यकाळ उलटून देखील न होणा-या बदलीमागचं नेमकं गौडबंगाल काय याची चौकशी करण्यासाठी कर्णिकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयानं हे आदेश दिले आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: