मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबद्दलची पडताळणीची सुविधा

मतदारांना आपले नाव मतदार यादीत असल्याबद्दलची पडताळणी करण्यासाठी संकेतस्थळ, टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन, एसएमएस तसंच प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन मतदारयादी पडताळणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी १ जानेवारी २०१९ रोजी वयाची १८ वर्ष पूर्ण झालेला युवक मतदानासाठी पात्र राहणार आहे. मतदार ओळखपत्र असलं तरी मतदारयादीत आपलं नाव असल्याची खात्री करणं आवश्यक आहे. त्यासाठी १९५० या टोल फ्री हेल्पलाईनवर अथवा nvsp.in  आणि  ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरही ही खात्री करता येणार आहे.

Leave a Comment