मखमली तलावाजवळील शिवआनंद उद्योग संकुलात मोठी आग – कोणतीही हानी नाही

मखमली तलावाजवळील शिवआनंद उद्योग संकुलात आज मोठी आग लागली होती. सुदैवानं यावर वेळीच नियंत्रण आणल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही. मखमली तलावाजवळ शिवआनंद उद्योग संकुल आहे. या इमारतीतील सदनिका क्रमांक ११८ मध्ये आग लागली होती. ही सदनिका काळभोर यांची असून त्यांनी विकी चव्हाण यांना भाड्यानं दिली होती. सकाळच्या सुमारास या सदनिकेमध्ये आग लागली. आगीनं रौद्र स्वरूप धारण केलं होतं. मात्र महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन ही आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या, जम्बो वॉटर टँकर आग विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. सुदैवानं आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानं पुढील हानी टळली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading