भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल

भिवंडी ते मुलुंड स्टेशन मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बदल करण्यात आला आहे. भिवंडीतील शिवाजी चौक ते मुलुंड स्टेशन पश्चिम बस क्रमांक ८८या मार्गावरील बसेसच्या वेळापत्रकामध्ये आजपासून हा बदल करण्यात आला आहे. मुलुंड स्टेशन पश्चिम ते भिवंडी या बसच्या एकूण ४४ फे-या असून सकाळी ५ वाजून ४० मिनिटांपासून रात्री ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत दर २० मिनिटांनी बसची फेरी होणार आहे. भिवंडीहून हीच बस दर २० मिनिटांनी सुटणार आहे. सकाळी ५ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत मुलुंड स्टेशन पश्चिम ते आनंदनगर तीन हात नाका मार्गे ही बस दर ३० मिनिटांनी तर आनंदनगर आगार ते मुलुंड स्टेशन पश्चिम ही बस दर ३० मिनिटांनी सुटणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: