भिवंडी-कल्याण-शीळफाटा या २१ किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रूंदीकरणाच्या कामाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. हा मार्ग २१ किलोमीटरचा असून शीळफाटा ते राजनोली जंक्शन असं काम होणार आहे. शीळफाटा रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी या रस्त्यावरून नाशिक मार्गे आग्र्याकडे तसंच गोवा, कर्नाटककडे होणारी अवजड वाहतूक आणि त्यामुळे निर्माण होणारे वाहतुकीचे प्रश्न या रूंदीकरणामुळे सुटणार आहेत. या मार्गाच्या रूंदीकरणासाठी २१२ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून येत्या ३० महिन्यात हे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे. या सहा पदरी कामामध्ये पलवा जंक्शन येथे दुपदरी उड्डाण पूल, पत्रीपूल येथे दुपदरी रेल्वे पूल, १४ मोठे जंक्शन्स, ३१ बस स्थानकं, २ पथकर स्थानकं असणार आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: