ब्राह्मण शिक्षण मंडळ संचालित ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोहिणी दिवाण यांचा सरलाताई चिटणीस स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरव झाला आहे. रोहिणी दिवाण यांनी ब्राह्मण विद्यालयाच्या पूर्व प्राथमिक विभागात सातत्यानं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले. मुख्यमंत्र्यांबरोबर बालवाडीतील मुलांची भेट, मुलांचे रेड कार्पेटवरून स्वागत, बाल शिक्षक दिन, वाचन महोत्सव अशा उपक्रमाची दखल घेऊन रोहिणी दिवाण यांची सरलाताई चिटणीस आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली. ज्ञानसाधना महाविद्यालयात झालेल्या स. वि. कुलकर्णी गौरव व्याख्यानमालेत विज्ञान साहित्यिक बाळ फोंडके यांच्या हस्ते रोहिणी दिवाण यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
