प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत ठाणे महापालिकेनं जप्त केलं १४ टन प्लास्टीक

ठाणे महापालिकेनं प्लास्टीक बंदीवरील कारवाई अंतर्गत १ हजार २३५ दुकानांवर कारवाई करत ३ लाख ५५ हजार रूपयांचा दंड वसूल केला असून १४ टन प्लास्टीक जप्त केलं आहे. महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं ही कारवाई केली. या कारवाई अंतर्गत मानपाडा प्रभाग समितीमधून एकूण ३० हजार रूपये दंड आणि ८३ किलो प्लास्टीक तर नौपाडा प्रभाग समितीअंतर्गत ३५ हजार दंड आणि १२० किलो प्लास्टीक जप्त करण्यात आलं. ही मोहिम राबवण्यासाठी ८० कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बिसलरी इंटरनॅशनल संस्थेनं बिसलरी बॉटल फॉर चेंज प्रोग्रामर या उपक्रमांतर्गत ५ ठिकाणी प्लास्टीक बाटल्या संकलन केंद्र उभारलं आहे. ही संकलन केंद्र मासुंदा तलाव, उपवन तलाव, टीएमटी बस स्थानक सॅटीस, डी-मार्ट घोडबंदर रोड आणि बेडेकर महाविद्यालय येथे उभारण्यात आली आहेत.

Leave a Comment

%d bloggers like this: