प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार १७ लाभार्थींना एलपीजीची जोडणी

प्रधानमंत्री उज्वला योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३१ हजार १७ लाभार्थींना एलपीजीची जोडणी दिल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या प्रशांत वर्मा यांनी दिली. जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत ६०४ जोडण्या इंडियन ऑईल, ११ हजार १५८ जोडण्या भारत पेट्रोलियम आणि १९ हजार २५५ जोडण्या हिंदुस्थान पेट्रोलियमने दिल्या आहेत. या जोडण्यांमध्ये अंबरनाथ ४ हजार ११९, भिवंडी ४ हजार २९, कल्याण १ हजार ४२, मुरबाड ७ हजार ५५, शहापूर ११ हजार ७५४, उल्हासनगर १५६५ तर ठाण्यामध्ये १ हजार ४५३ जोडण्या देण्यात आल्याचं प्रशांत वर्मा यांनी सांगितलं. जिल्ह्यामध्ये एलपीजीची जोडणी ९६.६ टक्के इतकी आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading