पोलीस भरतीतील दुर्घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल

पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी पोलीसांनी भरती प्रक्रियेत बदल केला आहे. पोलीस भरतीच्या दरम्यान भरतीसाठी मोठ्या प्रमाणावर युवक वर्ग येत असतो. पोलीस भरतीसाठी आधी शारीरिक चाचण्या घेतल्या जातात. या शारिरीक चाचण्यादरम्यान अनेकदा दुर्घटना झाल्या आहेत. त्याचप्रमाणे भरतीसाठी येणारा उमेदवार यांची संख्या यामुळे भरतीही लांबली जाते. त्यामुळे या भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. नवीन पध्दतीमध्ये पोलीस शिपाई पदाच्या भरती दरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा प्रथम घेतली जाणार आहे आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या तसंच आस्थापनेवर रिक्त होणा-या पदांच्या प्रमाणात आवश्यक तेवढ्याच योग्य उमेदवारांना शारिरीक चाचणीसाठी बोलवण्यात येणार असल्यानं भरती प्रक्रिया दीर्घकाळ सुरू न राहता जलद गतीनं पार पडेल. त्यामुळं जिल्ह्यातील उमेदवारांना जास्त दिवस ताटकळत रहावं लागणार नाही. या बदलाचा उमेदवारांनाच फायदा होणार आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: