पोलीसांकडच्या विविध परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्जाची सुविधा

पोलीसांकडून आवश्यक असणा-या वेगवेगळ्या परवानग्यांसाठी आता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. mahapolice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा वापर करून चरित्र पडताळणी, घरगुती मदत पडताळणी, कार्यक्रम समारंभ विनंती, भाडेकरू/ पी.जी पडताळणीची माहिती आणि मिरवणूक परवानगी सारख्या सुविधांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. एखाद्या निवासी संकुलामध्ये भाडेकरूस जागा दिल्यास त्याची माहिती पोलीसांना देणं आवश्यक आहे. सध्या या करिता विहित नमुन्यातील अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेली कागदपत्रं जोडून माहिती द्यावी लागते. आता या संकेतस्थळावर घरबसल्या भाडेकरूंची माहिती पोलीसांना सादर करता येईल. ठाणे पोलीसांच्या संकेतस्थळावरही यासाठी लिंक उपलब्ध करून देण्यात आली असून आता घरमालकाला ही माहिती देण्यासाठी पोलीसांपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. ठाणेकरांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे पोलीसांतर्फे करण्यात आलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: