पॅगोडा अँट मुग्यांचं अनोखं घरटं

पर्यावरणाचा समतोल राखला की आपसूकच त्याठिकाणी निसर्गाचं अनोखं जग बघायला मिळत. ठाणे पूर्व चेंदणी कोळीवाडा बंदरवरील (विसर्जनघाट) भागात ठाणे महापालिकेने परिसराचा कायापालट केला असताना पर्यावरण संवर्धनाकडे तितकंच लक्ष दिलं आहे. येथील झाडांनी बहर घेतल्यामुळे जंगलात दिसणाऱ्या पॅगोडा अँट मुंग्या चक्क एका झाडावर घरट बांधून रहात आहेत. लाळ, माती आणि पानाचा चुऱ्याच्या मदतीने पॅगोडा आकाराचे घरटे तयार केले असून, ते इतके मजबूत असत की, उन वारा पावसाचा घरट्यावर कोणताही परिणाम होत नाही. ठाणे पूर्वची चौपाटी म्हणून चेंदणी कोळीवाडा बंदरवर ओळखले जाते. अशातच पालिकेने या ठिकाणी स्मार्ट्सीटी अंतर्गत उत्तम सोयी सुविधा निर्माण केल्या असून, शोभेची झाड फुलझाड सोबतच मोठी झाडे विकसित केली आहेत. त्यामुळे सकाळच्या वेळी अनेक पक्ष्यांचा किलबिलाट, साप, मुंगूस, घोरपडी सारखे प्राणी नजरेच्या टप्प्यात येतात. अशातच एका झाडावर पॅगोडा अँट मुग्यांचे झाडावरील घरटे लक्ष वेधत आहे. पानाचा चुरा, माती आणि लाळ यांच्या मिश्रणाने घरट बांधले जात असल्याची माहिती ज्येष्ठ सूक्ष्मजीव अभ्यासक युवराज गुर्जर यांनी दिली. झाडावरील पॅगोडा अँट या मुंग्यांचे विश्व वेगळे आहे. सर्वसाधारण मुंगी वारूळ, भिंत, लाकडाच्या पोकळीत आपल जीवन व्यथित करतात. मात्र पॅगोडा अँट या मुंग्यांची वसाहत झाडावरील घरट्यात असते. घरट्याची रचना पॅगोडा पद्धतीची असते. घरट्यात अनेक कप्पे असून हजारो मुंग्या गुणा गोविंदाने रहातात. उन पाऊस थंडीचा घरट्यावर कोणता परिणाम होत नाही. आपल्याकडे दिसणाऱ्या मुंग्या पेक्षा या मुंग्या थोड्या मोठ्या असतात. ही मुंगी चावली तर वेदना बराच वेळ रहातात.
जगभरात सर्वच देशात मुंग्याचे अस्तित्व असून, सुमारे १२ हजाराहून अधिक मुंग्याचे प्रकार आहेत. सर्वसाधारण आपल्याकडे लाल आणि काळया रंगाच्या मुंग्या आढळतात. यातील लाल रंगाच्या मुंग्या अधिक आक्रमक असतात. जंगलात मुंग्यांच्या अनेक जाती बघायला मिळत असताना, काही वेळा नकळतपणे झाडावर वेगळ्या प्रकारचे घरटे बांधणाऱ्या पॅगोडा अँट जातीच्या मुंग्या सर्वांचे लक्ष वेधतात. चेंदणी कोळीवाडा बंदरवर वॉटर फ्रंट डेव्हलमेंटची विकासकामे सुरू असताना, निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. विविध प्रकारची झाडे या ठिकाणी लावली असून, जुन्या झाडांचे संरक्षण केलं आहे. त्यामुळे जैवसाखळी वाढली असल्याचे पर्यावरण प्रेमी सांगतात. पॅगोडा अँट मुंग्याच झाडावरील वारूळ संकेत आहे. पॅगोडा अँट मुंग्यांच्या संपर्कात आल्यावर ही मुंगी कडकडून चावते. पण सुतार पक्षी याला अपवाद आहे. सुतार पक्षी हा झाडाच्या ढोलीत पिल्लांचे पालनपोषण करत असला तरी काही वेळा पॅगोडा अँट या मुंग्यांच्या घरट्यात आपली पिल्ल ठेवतो.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading