मंजूर विकास आराखड्यातील रस्ते मोकळे करून हे रस्ते रूंद करण्याची कारवाई सुरू झाली असून वाघबीळ नाका ते वाघबीळ गाव या रस्त्यावरील ११४ व्यावसायिक बांधकामं पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत जमिनदोस्त करण्यात आली. या रस्त्यात बाधित होणा-या १३ निवासी बांधकामांमध्ये राहणा-या कुटुंबांचं पुनर्वसन करून ही बांधकामंही निष्कासित करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. या कारवाईमुळं आता हा रस्ता ४० मीटरचा होणार आहे. घोडबंदर सेवा रस्त्यावरील २३ गॅरेजेसवरही कारवाई करण्यात आली. उद्या वागळे इस्टेटमधील रस्ता क्रमांक १६, २२ आणि ३३ या रस्त्यांचं रूंदीकरण हाती घेतलं जाणार आहे.
