पालिका मुख्यालयातील इमारतीच्या सज्जाचा काही भाग कोसळल्यानं आरोग्य अधिका-यांच्या गाडीचं नुकसान

ठाणे महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचा सज्जा कोसळून पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. आर. टी. केंद्रे यांच्या शासकीय गाडीचे नुकसान झाले आहे. काल सकाळी ही घटना घडली. सुदैवानं यावेळी पालिकेच्या आवारात कुणीच नसल्यानं कोणतीही हानी झाली नाही. पाचपाखाडीतील ठाणे महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत १९८५ साली बांधण्यात आली आहे. बांधकाम जीर्ण झाल्यानं सध्या पालिका मुख्यालयाच्या इमारतीची डागडुजी सुरू आहे. काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मुख्यालयाच्या पाठीमागील प्रवेशद्वाराजवळील इमारतीच्या तिस-या माळ्यावरील स्लॅबचा काही भाग आवारात उभ्या करून ठेवलेल्या आरोग्य अधिका-यांच्या गाडीवर पडल्यानं गाडीच्या काचा फुटून नुकसान झाले. या घटनेनं पालिका मुख्यालयाच्या निकृष्ट बांधकामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading