पारसिक रेतीबंदर येथील शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्‌यार्थ्यांसाठी आरोगय आणि कला शिबीराचं आयोजन

ठाणे महापालिकेच्या पारसिक रेतीबंदर येथील शाळा क्रमांक ४९ आणि ९३ येथे विद्‌यार्थ्यांसाठी आरोगय आणि कला शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीराला महापालिका आयुक्त आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भेट दिली. गेले १५ दिवस पारसिक रेतीबंदर येथील ८ झोपडपट्ट्यांमध्ये मिसाल मुंबई या स्वयंसेवी संस्थेच्या वतीनं रंगरंगोटी आणि मुलभूत सुविधा देण्याची कार्यवाही सुरू आहे. काल दुपारी रूबल नागी फौंडेशन आणि मिसाल मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला आयुक्त आणि जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत पारितोषिकं प्रदान केली.

 

Leave a Comment

%d bloggers like this: