नुसत्या तत्वज्ञानाची अंगाई गीतं गाऊन त्यांचे मित्रत्व कालत्रयी साधणार नाही. जशास तसे याच राजनितीने परकीयांशी आपण वागू तरच टिकू आणि जिंकू असे विचार ७० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केले होते. आज पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या हल्ल्यामुळे सावरकरांचा द्रष्टेपणाच सिध्द होत आहे. सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून दहशतवाद्यांची नांगी मोडली आणि सावरकरांना एकप्रकारे अनोखी श्रध्दांजली पंतप्रधानांनी वाहिली असं दिसत आहे.
