परिवहन सेवेतील कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा अथवा वारसा हक्क तत्वावर नोकरी उपलब्ध करून देण्याची नरेश म्हस्केंची मागणी

ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेतील कर्मचा-यांच्या वारसांना अनुकंपा अथवा वारसा हक्क तत्वावर नोकरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी परिवहन व्यवस्थापकांकडे केली आहे. परिवहन सेवेतील एखादा कर्मचारी अपघाताने, हृदयविकाराने अथवा गंभीर आजाराने किंवा नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या कुटुंबास काळाच्या आघातासोबत आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशावेळी संबंधित मृत पावलेल्या कर्मचा-यांच्या वारसांना महापालिकेच्या परिवहन सेवेमध्ये अनुकंपा अथवा वारसा हक्कानं नोकरी देणं आवश्यक असून ही कार्यवाही परिवहन प्रशासनानं तत्परतेनं करणं अपेक्षित असल्याचं सभागृह नेत्यांनी सांगितलं. परिवहन सेवेतील कर्मचा-यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरीची नितांत आवश्यकता असून ते या अनुषंगानं वेळोवेळी प्रशासनाकडे पत्रव्यवहार देखील करत असतात. त्यांना विहीत कालावधीत न्याय मिळणं अपेक्षित असतं. या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून परिवहन सेवेतील मृत कर्मचारी ज्या पदावर कार्यरत असेल ते पद अनुकंपा अथवा वारसा तत्वानं भरण्यासाठी विहीत कालावधीत प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करावी असं सभागृह नेत्यांनी म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading