नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळेला प्रथम क्रमांक

नि.गो. पंडीतराव राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रज्ञा पोवळे हिनं प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयीन क्षेत्रात अत्यंत मानाची समजली जाणारी नि. गो. पंडीतराव ढाल पटकावली आहे. समर्थ सेवक मंडळाच्या वतीनं या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेचं यंदाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष होतं. त्यामुळं सुवर्ण महोत्सवी वर्षात के. सी. महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या प्रज्ञा पोवळे हिनं ही ढाल पटकावत बाजी मारली. यंदा या स्पर्धेत ८४ स्पर्धक सहभागी झाले होते. प्रज्ञा पोवळे हिने गदिमा आणि बाबूजी मराठी भावविश्वातील सौंदर्य शिल्प या विषयावर आपली मतं मांडली. सप्त हा ऐनवेळी दिलेला विषयही प्रज्ञानं अतिशय सफाईदारपणे मांडून आपल्या वक्तृत्वाची झलक दाखवली. स्पष्ट उच्चार, विषयाची प्रभावीपणे मांडणी आणि स्वत:ची वेगळी शैली यामुळे तिला हे यश साध्य करता आलं. दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरिश कुबेर यांच्या हस्ते तिला पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रज्ञा ही के. सी. कॉलेजमध्ये पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण घेत आहे. दैनिक सामनाचे वरिष्ठ पत्रकार राजेश पोवळे यांची ती मुलगी आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: