नवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकसान

नवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही. नवीन पोलीस वसाहतीजवळील सिध्दी हॉलच्या मागच्या बाजूस सकाळच्या सुमारास झाड पडलं. या झाडाच्या खाली जगदिश बोरसे आणि अनिकेत कदम यांच्या गाड्या सापडल्यानं गाड्यांचं नुकसान झालं. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं त्वरीत धाव घेऊन हे झाड हटवण्याचं काम सुरू केलं.

 

Leave a Comment

%d bloggers like this: