देशात पहिल्यांदाच थ्री डायमेन्शन सुपर इनपोझिशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हत्येचा उलगडा

अंबरनाथ पोलीसांनी ८ महिन्यापूर्वी झालेल्या एका हत्येचा छडा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून लावला आहे. या गुन्ह्याच्या तपासात देशात पहिल्यांदाच थ्री डायमेन्शन सुपर इनपोझिशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अंबरनाथच्या जावसई डोंगरावर एप्रिल महिन्यात शीर कापलेला एक अज्ञात मृतदेह आढळला होता. या मृतदेहापासूनच काही अंतरावर त्याचं शीर सापडलं होतं. पण हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणं हे एक मोठं आव्हान होतं. मात्र अंबरनाथचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी केईएम रूग्णालयाचे तज्ञ डॉ. हरिश पाठक यांची मदत घेतली. पाठक यांनी मृतदेहाच्या कवटीच्या सहाय्यानं थ्री डायमेन्शन सुपर इनपोझिशन या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मृत व्यक्तीचा ढोबळ चेहरा तयार केला. या चेह-याच्या सहाय्यानं शोध घेतला असता तो ब्रिंदेश प्रजापती असल्याचं समोर आलं. तो एप्रिल पासून बेपत्ता होता. त्यामुळं त्याच्या पत्नीची चौकशी करण्यात आली. त्यावेळी सर्व प्रकार समोर आला. ब्रिंदेश प्रजापतीच्या पत्नीनंच अनैतिक संबंधातून ही हत्या केल्याचं उघड झालं. सावित्रीचे किसनकुमार कनोजिया यांच्याशी अनैतिक संबंध होते. त्यात पती अडसर ठरत असल्यानं या दोघांनी राजेश यादव आणि अन्य एका सहका-याच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचं निष्पन्न झालं. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading