दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवुन नवा आदर्श केला निर्माण

दुबईतील तेरा वर्षाच्या रीचा तुळपुळेन लहान वयातच सामाजिक जाणीव जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे. पॅडमॅन चित्रपटापासून प्रेरणा घेत रिचान महाराष्ट्रतील मुलींना सॅनिटरी पॅड पुरवण्यासाठी निधी जमा केला. आणि महिनाभरातच समन्वय प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील अडिचशे मुलींना वर्षभरासाठी पॅड वाटप केले. समन्वय प्रतिष्ठान च्या माध्यमातून शहापूर येथील ग वी खाडे विद्यालयात हा कार्यक्रम झाला. सुमारे तीन महिन्यापूर्वी रिचा तुळपुळे हिने पॅडमॅन चित्रपट पाहिला. या चित्रपटातील महिला आणि किशोरवयीन मुलींची व्यथा पाहून ती विचारमग्न झाली. ग्रामीण भागात किशोरवयीन मुलींची किती वाईट स्थिती असेल याचा अंदाज रिचाला आला. तिने ग्रामीण भागातील मुलींना सॅनिटरी पॅड असे वाटप करण्याची योजना आखली. दुबईत दिवाळी निमित्ताने विविध कार्यक्रम झाले. त्यात रिचान आपली योजना स्पष्ट केली. तसेच दानशूर व्यक्ती, मित्रपरिवार आणि नातेवाईकांना सामाजिक संकेत स्थळांवर आवाहान केले. काही दिवसातच तिच्याकडे पुरेसा निधी जमा झाला. गेल्या महिन्यात आमदार निरंजन डावखरे यांनी दुबईला भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही मराठी कुटुंबियांबरोबर रिचा आणि तिचे वडील राहुल तुळपुळे यांची डवखरे यामच्या बरोबर भेट झाली.रिचाने यावेळी आपली योजना त्यांना सांगितली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील किशोरवयीन मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी पॅड वाटप करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली. त्यानुसार शहापूर मध्ये काल सॅनिटरी पॅड्स वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्याच्या विविध शाळांमधील अडीचशे मुलींना वर्षभरासाठी सॅनिटरी पॅड देण्यात आले. यावेळी रिचाने मुलीं बरोबर संवादही साधला. शहापूर तालुक्यातील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी रिचार्ज कौतुक केलं.

Leave a Comment