तरुणाला समजविण्यासाठी गेलेल्या शेजाऱ्यालाच गमवावा लागला जीव

विदेशात नोकरी करणा-या भावाला मामाने मुलगी देण्याचं कबूल केल्यानंतर लग्नास नकार दिला. याच रागाच्या भरात आपल्या आईला शिवीगाळ करून मामाला ठार मारण्याचा निर्धार केलेल्या तरूणाला समजावण्याचे प्रयत्न करणे शेजा-याला चांगलेच महागात पडले. त्याला यामध्ये आपला जीव गमवावा लागला. पोलीसांनी याप्रकरणी नदीम शेखला अटक केली आहे. सिमरन शेख यांच्या शेजारी सुरैय्या शेख आणि त्यांचा मुलगा नदीम राहत होते. कदर शेख आणि त्यांचा दुसरा मुलगा इब्राहिम हे विदेशात नोकरीला होते. इब्राहिमचा विवाह मामा बशीर यांच्या मुलीशी निश्चित झाला होता. मात्र ऐन लग्नाच्या वेळी मामा बशीरनं मुलगी देण्यास नकार दिला. यावरून रविवारी संध्याकाळी नदीमनं आपली आई सुरैय्याला शिवीगाळ करत बशीरला खलास करतो म्हणून धमकी दिली. सुरैय्यानं शेजारी राहणा-या सिमरन शेख यांना विनंती केली. त्यानुसार सिमरन यांचा पती नौशाद शेख आणि सिमरनचा भाऊ शहाबाज खान हे नदीमला समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र तुम्ही समजावणारे कोण असा प्रश्न करत घरातील कात्री घेऊन नौशादच्या छातीवर नदीमनं वार केला. यावरून गोंधळ झाला. त्यावेळी मुस्तफा नावाची आणखी एक व्यक्ती मदतीसाठी धावून आली पण त्याच्यावरही नदीमनं कात्रीनं वार करत त्याला जखमी केलं. यामध्ये नौशादचा मृत्यू झाला. तर मुस्तफावर उपचार सुरू आहेत. यामध्ये नौशादला नाहक आपला जीव गमवावा लागला.

Leave a Comment

%d bloggers like this: