डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोणत्याही परिस्थितीत दिव्यांगांना स्टॉल वितरित करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. उर्वरित स्थळांची प्रभाग निहाय यादी एका आठवड्यात सादर करण्याचे आदेशही यावेळी दिले. दिव्यांगांना देण्यात येणा-या स्टॉल्सचे डिझाईन यापूर्वीच अंतिम करण्यात आले असून त्यामध्ये आवश्यकता भासल्यास किरकोळ बदल करून निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. नवीन रस्त्यावर किंवा मॉडेल रस्त्यावर स्टॉलची जागा देण्यात येऊ नये. तसंच मुख्य रस्ते, पदपथ अडवले जाणार नाहीत याची दक्षता घेऊन स्टॉलची जागा निश्चित करण्याच्या सूचना यावेळी पालिका आयुक्तांनी दिल्या.
