पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. गेले काही महिने डहाणू आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के बसत असून यामुळं या परिसरात घबराट निर्माण झाली आहे. डहाणूमध्ये या महिन्याच्या सुरूवातीलाही सौम्य धक्का बसला होता तर आज सकाळी ७ च्या सुमारास ३.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याचा केंद्रबिंदू जमिनीखाली १० किलोमीटरवर होता असं सांगण्यात आलं.
