ठाण्यामध्ये गाडीची काच फोडून लाखोंची रोकड लंपास करण्याचा प्रकार घडला आहे. विलेपार्ले इथे राहणारे बाबूलाल शर्मा यांच्या कारची काच फोडून चोरट्यांनी २ लाख ३६ हजारांची रोकड लांबवली. बांधकाम व्यावसायिक असलेले बाबूलाल शर्मा मुलुंड येथे त्यांच्या मित्राला दिवाळीनिमित्त साहित्य देऊन कापुरबावडी येथील मसाज स्पा मध्ये गेले होते. त्यांनी आपली गाडी सेवारस्त्यावर उभी केली होती. मसाज झाल्यानंतर संध्याकाळी ७ वाजता परतल्यावर त्यांना गाडीची मागची काच फोडलेली आढळली. गाडीतील सीटवर ठेवलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली होती. या बॅगेमध्ये २ लाख ३६ हजारांची रोकड होती.
![](https://thanevarta.in/wp-content/uploads/2018/11/car-theft.jpg)