ठाण्यामध्ये अमोनिया पावडर सापडल्यामुळे पोलीसांनी चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. ठाण्याच्या कोलशेत खाडी परिसरात काल रात्री साडेदहाच्या सुमारास कापुरबावडी पोलीसांना ही अमोनियाची पावडर सापडली. त्यावेळी खाडी परिसरात ४-५ जण संशयास्पदरित्या फिरत होते. ही पावडर टाकणारे नक्की कोण होते याचा पोलीस शोध घेत आहेत. घातपात घडवून आणण्याच्या संशयानं ही अमोनियाची पावडर आणण्यात आली होती का यादृष्टीनंही पोलीसांचा तपास सुरू आहे. सध्या ठाणे आणि भिवंडीच्या खाडी किनारी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
